Menu Close

सुट्टीवर घरी आलेल्या सैनिकाची आतंकवाद्यांकडून अपहरण करून हत्या

सैनिकाचे अपहरण करून हत्या करण्याची ही या वर्षातील दुसरी घटना !

जेथे सैनिकच सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसामान्य लोक कसे सुरक्षित असतील ? तरीही सरकार म्हणते की, काश्मीरमधील आतंकवाद न्यून झाला आहे !

श्रीनगर : पुलवामा येथील गुरेज सेक्टरमध्ये रहाणारा इरफान नावाचा सैनिक सुट्टीवर घरी आला होता. आतंकवाद्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली आणि येथील जंगलात त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी इरफानचा मृतदेह कह्यात घेतला आहे. या घटनेची मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी निंदा केली आहे.

सैनिकाचे अपहरण करून हत्या करण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मे मासामध्ये लेफ्टिनेंट डॉ. उमर फय्याज यांचेही अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *