Menu Close

कामोठे (नवी मुंबई) येथे प्रथमोपचार प्रशिक्षण विषयावर मार्गदर्शन !

कामोठे : येथील ‘रॉयल दीप सोसायटी’मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आधुनिक वैद्य तांबेकर आणि श्री. मनिष माळी यांनी प्रथमोपचार प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. प्रथमोपचार पेटीत आवश्यक असणार्‍या साहित्याची माहितीही देण्यात आली, तसेच त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने प्रथमोपचार कसे करावेत याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ३१ जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. या वेळी आधुनिक वैद्य तांबेकर म्हणाले की, सध्या अपघात, जातीय दंगली, नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण वाढत असल्याने आपल्याला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण लाभदायक ठरते. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *