Menu Close

निर्मात्यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलला

करणी सेनेच्या विरोधाचा परिणाम !

नवी देहली : वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेण्यात आला. यापूर्वी हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. चित्रपटाला होत असलेला विरोध, त्यातील कलाकार आणि दिग्दर्शक यांना देण्यात आलेल्या धमक्या, तांत्रिक चुकांमुळे हा चित्रपट परत पाठवण्याचा केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाचा निर्णय, यांमुळे निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. ‘चित्रपट प्रदर्शित करण्याचा दिनांक लवकरच घोषित केला जाईल’, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते ‘व्हायाकॉम-१८ मोशन्स पिक्चर्स’च्या प्रतिनिधींनी दिली. ‘आम्ही स्वेच्छेने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकत आहोत’, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *