Menu Close

जिल्हास्तरीय समितीत हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देण्याचे नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

जिल्हाधिकारी कलशेट्टी

नंदुरबार : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाण्याविषयी व्यापक प्रबोधन करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याचे पालन व्हावे, तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला अनुमती द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीचे निवेदन वाचून जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी जिल्हास्तरीय समिती लवकरच स्थापन करू आणि त्यात हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देऊ, असे आश्‍वासन दिले. समितीच्या राष्ट्रध्वजविषयक चाललेल्या प्रबोधन कार्याला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *