Menu Close

सोलापूर येथील श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवाचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वागत !

सोलापूर : येथील पद्मशाली समाजाचे आद्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मोठ्या प्रमाणात तेलगू भाषिक वेळ काढून आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या रथोत्सवाला उपस्थित रहातात. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून रथाचे स्वागत केले. तसेच हार्दिक शुभेच्छांचा फलकही लावण्यात आला. या वेळी श्री. यल्लाप्पा चौगुले, तिरुपती श्रीराम, आप्पू रत्नाकर, सतीश गुंडूर, शंकर चिट्टयाल, सत्यनारायण कनकी, बालराज दोंतुल, रमेश आवार, तरुण आवार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *