Menu Close

तृप्ती देसाई व त्यांच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

वाकड : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, त्यांचे पती आणि अन्य चौघांविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.

विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांत ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार जातीवाचक शिवीगाळ करून खंडणी मागणे, मारहाण करणे, रस्ता अडविणे असे गुन्हे या सर्वांवर दाखल करण्यात आले आहेत. याबाबत हिंजवडी पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, २७ जून २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी मकासरे बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडकडे मोटरीतून तृप्ती देसाईंसोबत जात होते.

दरम्यान प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघे चारचाकी मोटारीतून आले. त्यांनी फिर्यादी विजय मकासरे यांना गाडी  थांबवायला भाग पाडले. तृप्ती देसाईसह सर्वांनी आपल्याला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि २७ हजार रुपये काढून घेतले.

तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.

 

संदर्भ : लोकमत

Read more on पोलीस

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *