Menu Close

धर्मांधाकडून हिंदु तरुणीचा लैगिंक छळ करून बळजोरीने धर्मांतर

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : येथील जहांगिराबाद भागात न्यायालयात जबाब नोंदवायला गेलेल्या हिंदु तरुणीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केले. गेल्या काही दिवसामध्ये एका बुलंदशहरामध्ये लव्ह जिहादची ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

१. तरुणीने जवाबामध्ये आरोपी अब्बास मिर्झा याच्यावर अपहरण, बलात्कार करणे, बळजोरीने कोर्‍या कागदावर सही करून विवाह आणि धर्मांतर यांचे कागद सिद्ध केल्याचे आरोप केले.

२. तरुणीने न्यायालयात सांगितले की, अमली पदार्थ पाजून बेशुद्ध करून तिचे बळजोरीने धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्यात आला होता.

३. १ मे या दिवशी अब्बासच्या वाढदिवसाला त्याच्या पत्नीने घरी बोलावून अपहरण केले.

४. अपहृत तरुणी १२ मे या दिवशी देहली येथे सापडली. आरोपी अब्बास याला पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे.(हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवायचे आणि त्यांचे धर्मांतर करायचे, असेच धर्मांधांचे षड्यंत्र आहे; मात्र ‘लव्ह जिहाद’ नावाचा प्रकार माहिती नसल्याचे म्हणणारे गृहमंत्री कधीही हा प्रकार थांबवणार नाहीत’, हे हिंदूंनी लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *