Menu Close

चोपडा (जळगाव) येथे राष्ट्राभिमानी युवकांनी केली महाराणा प्रताप अन् हुतात्मा स्मारकाची स्वच्छता

महाराणा प्रताप स्मारकाची स्वच्छता करतांना धर्माभिमानी

चोपडा : येथील नागलवाडी गावातील महाराणा प्रताप यांचे स्मारक आणि छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील नक्षलवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या नागलवाडीचे वीर सुपुत्र नाना उदयसिंग सैंदाणे यांचे स्मारक या दोहोंची स्वच्छता करून मानवंदना देण्यात आली. या वेळी महाराणा प्रताप नवयुवक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. नीलेश राजपूत, मंडळाचे राष्ट्राभिमानी युवा सदस्य आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

जळगाव, धुळे, नंदुरबार येथे ६२ हून अधिक होर्डिंग्ज प्रदर्शित

जळगाव, धुळे, नंदुरबार येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्रपर असलेल्या विचारांचे ६२ हून अधिक ठिकाणी ‘होर्डिंग्ज’ लावण्यात आले. त्यामुळे समाजातील सहस्रोंपर्यंत हिंदु राष्ट्राचे विचार पोहोचले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *