Menu Close

करिश्मा अझीझ हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा देहली पोलिसांना आदेश

हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंतप्रधान मोदी आदींच्या विरुद्ध आक्षेपार्ह टिपण्या केल्याचे प्रकरण

नवी देहली – हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक व्यक्ती यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना कुत्र्याशी केल्याच्या आरोपावरून येथील पटियाला हाऊस न्यायालयाने देहली पोलिसांना सामाजिक माध्यम वापरकर्त्या करिश्मा अझीझ हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘करिश्मा अझीझविरुद्धच्या आरोपांवरून दखलपात्र गुन्हे घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आणि या प्रकरणाच्या अन्वेषणाची आवश्यकता आहे.’ अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. (हिंदु धर्म आणि क्रांतीकारक यांच्या अवमानाविरोधात सतत जागृत राहून कायदेशीर लढाई लढणार्‍या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! देशातील प्रत्येक हिंदु अधिवक्त्याने त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे ! – संपादक)

 

काय होत्या आक्षेपार्ह टिपण्या ?

अ. एका हिंदु संतांच्या आध्यात्मिक विचारांची आणि त्यांच्या अपंगत्वाची टिंगल उडवणे.

आ. भारताच्या पंतप्रधानांची तुलना कुत्र्याशी करणे.

इ. हिंदु योद्धे आणि ऐतिहासिक व्यक्ती यांची थट्टा करणे.

ई. औरंगजेबाचे उदात्तीकरण करत हिंदु प्रतीकांचा अवमान करणे.

उ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘देशद्रोही’ असा उल्लेख करणे आणि हिंदु धर्म अन् देशभक्तीच्या भावनांना लक्ष्य करणे.

देहली पोलिसांची बोटचेपी भूमिका

देहली पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या उत्तरात म्हटले होते की, या टिपण्यांमध्ये  अश्‍लीलता असली आणि हिंदु धर्माला लक्ष्य केले गेले असले, तरी ते राजकीय/ऐतिहासिक भाष्य, टीका आणि उपहासात्मक स्वरूपाचे आहे. तसेच प्राथमिक चौकशीत धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. (मुसलमानांच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान झाला असता, तर त्यांनी पोलिसांकडे न जाता थेट आरोपीचा शिरच्छेद (सर तन से जुदा) करण्यासाठी आंदोलन केले असते. येथे हिंदू असल्याने पोलीस त्यांना कस्पटासमान मानत आहेत ! – संपादक)

यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, या टिपण्या राजकीय भाष्य किंवा उपहास यांच्या कक्षेत येतात कि त्यांनी गुन्हेगारीची वेस ओलांडली आहे, हा अन्वेषणाचा विषय आहे. (न्यायालयाने अशा पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश दिला, तरच त्यांना वचक बसेल ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी हिंदूंना न्यायालयात जावे लागते, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद !
  • देहलीत भाजपचे सरकार असतांना पोलीस या घटनांवर गुन्हा नोंद करत नाहीत, हे लज्जास्पद ! सरकारने अशा पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

संदर्भ : सनातन प्रभात 

Read more on Pro Hindu

Latest News