कर्नाटक सरकारमधील मंत्री शिवराज तंगडगी यांना प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते चक्रवर्ती सुलीबेले यांचे आव्हान

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘वन्दे मातरम्’च्या २ कडव्यांपेक्षा अधिक कडवी गायल्यास मंत्री तंगडगी कारवाई करणार आहेत. शाब्बास ! स्वातंत्र्य संग्रामाचा श्वास असलेले वन्दे मातरम् गाण्यासाठी त्या वेळी कोतवालाची अनुमती घ्यावी लागली; पण आम्ही हे आव्हान स्वीकारत आहोत.
Vande Mataram is not up for negotiation. You want to threaten action for singing more than two stanzas? Try it. We sang it yesterday, we are singing it today, and we will keep singing it tomorrow—no matter what. Challenge accepted. https://t.co/7fAKto4sTc
— Chakravarty Sulibele (@astitvam) September 18, 2026
कालही वन्दे मातरम् पूर्ण गायलो होतो, आजही गाणार, उद्याही. यापुढे मंचावरील सर्व कार्यक्रम संपूर्ण ‘वन्दे मातरम्’नेच संपू दे. धाडस असेल, तर कारवाई करा, असे प्रत्युत्तर प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते चक्रवर्ती सुलीबेले यांनी मंत्री तंगडगी यांना दिले.
सुलीबेले पुढे म्हणाले की, सरकारी नियमांनुसार राष्ट्रगीताची ठरलेली कडवीच गायली पाहिजेत, हा सरकारचा युक्तीवाद असला, तरी हे बंधन राष्ट्रप्रेमाच्या भावनांना धक्का पोचवते.
संपादकीय भूमिका
कर्नाटकातील सर्व हिंदुत्वनिष्ठ नेते आणि सर्वसामान्य हिंदू यांनी संपूर्ण वन्दे मातरम् गाण्यासाठी राज्यभर विशेष कार्यक्रम आयोजित करून सरकारचे नाक दाबले पाहिजे !
संदर्भ : सनातन प्रभात







