Menu Close

गुजरात राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

बडोदा येथे हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

हिंदु राष्ट्र जागृती सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

बडोदा (गुजरात) : हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे १३ मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गोरक्षण, राममंदिर प्रश्‍न, बांगलादेशी घुसखोरी आदी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी माहिती दिली. सभेला सनातन संस्थेच्या सौ. अंशू संत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखील दर्जी यांनी संबोधित केले.

क्षणचित्रे

१. आपडू वडोदरा या फेसबूक पानावर अ‍ॅडमिन श्री. पृथ्वी देसाई यांनी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे निमंत्रण प्रसारित केले होते. या पानाचे १ लक्ष दर्शक आहेत.

२. अखिल महाराष्ट्र युवा मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय जाधव म्हणाले, तुमचे विषय ठरलेले होते, हे अतिशय आवडले.

३. सभेला उपस्थित धर्माभिमान्यांनी वक्त्यांच्या वाक्यांना उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *