Menu Close

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेग्गीन्स सार्इट वरुन काढले

हिंदुंच्या संघटित विरोधाचा परिणाम

न्यू जर्सी (अमेरिका) : अमेरिकेतील व्हेन्टनॉर सिटी (न्यू जर्सी) येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ या किरकोळ विक्रेता आस्थापनाने त्यांच्या लेग्गीन्सवर (पायात घालवायची वस्त्रे) हिंदु देवता भगवान शिव आणि श्री गणेश यांच्या प्रतिमा छापून देवतांचे विडंबन केले होते.

हे लक्षात येताच अमेरिकेतील प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेता श्री. राजन झेद यांनी या आस्थापनाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हि माहिती सर्वत्र प्रसारीत झाली.

हिंदु जनजागृती समितीने ही फेसबूक व ट्वीटर च्या माध्यमातुन हिंदुंना जायेझ एक्टिव्हवेअर आस्थापनचा विरोध करण्याचे आवाहन केले. हिंदुंनी केलेल्या विरोधामुळे आस्थापनाने देवी-देवतांचे चित्र असलेले लेग्गीन्स सार्इट वरुन काढले.

हे चित्र केवळ संदर्भासाठी दिले आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा यात उद्देश नाही.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *