Menu Close

पेट्रोलपंपांच्या मालकांकडून ग्राहकांचे हित जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे मुझफ्फरपूर, बिहार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

पेट्रोलपंप अभियान

हिंदुत्वनिष्ठांचा पुढाकार

मुझफ्फरपूर (बिहार) : पेट्रोलपंपांच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहारच्या मुझफ्फरपूर येथील जिल्हाधिकारी धर्मेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी ‘या सदंर्भात योग्य ती कारवाई करू’, असे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीचे सर्वश्री सुशील चाचान, मुकेश चौधरी, ब्रजमोहन मिश्रा आणि अधिवक्ता सुरेश सहनी, तसेच श्री. मृत्युंजय हे उपस्थित होते.

अधिवक्त्यांकडून हिंदु जनजागृती समितीच्या सामाजिक कार्याचे कौतुक

या वेळी तेथे उपस्थित अन्य अधिवक्त्यांनी समितीच्या या कार्याचे कौतुक केले. तसेच ‘समाजाच्या उत्थानासाठी अशा कार्याची आवश्यकता आहे आणि याचा लाभ सर्वांना होणार आहे’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *