Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन रोखावे !

डावीकडून निवेदन स्वीकारतांना तहसीलदार गार्गी जैन, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वंदना, श्री. चंद्रशेखर, श्री. कृष्णकुमार शर्मा, श्री. केशव गौडा, श्री. लोकेश आणि श्री. प्रशांत

पुत्तुरू (कर्नाटक) : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. आधुनिकतेच्या प्रभावाने निर्माण झालेली सामाजिक समस्या रोखण्यासाठी ‘मातृ-पितृ पूजनदिन’सारखे कार्यक्रम आयोजित केल्यास आई-वडिलांकडे प्रेमाने आणि सन्मानाने पहाण्याकडे कल वाढतो. एवढेच नव्हे, तर अशा ‘मातृ-पितृ पूजनदिना’चे आयोजन करण्यास शासकीय नियमांनुसार प्रोत्साहन देणे आवश्यक झाले आहे. याविषयी सामाजिक दृष्टीकोनातून तरुण पिढीत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे निवेदन देण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी या विषयी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *