Menu Close

पंढरपूरसह सर्वच तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक ! – चंद्रकांत पाटील

Vitthal-Rukmini-Payi-Wari

पंढरपूर : तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कार्तिक वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी ते येथे आले होते. भाजप नेते बागल यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले. (शासनाने या इच्छाशक्तीला लवकरात लवकर कृतीची जोड देऊन तीर्थक्षेत्रांचे होत असलेले पावित्र्य राखावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात)

चंद्रकांत पाटील अन्य एका प्रश्‍नाला उत्तर देतांना पुढे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळ्याविषयी सीआयडी चौकशी चालू असून जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *