Menu Close

बहराईच : पतीने दिलेल्या तोंडी तलाकचा विरोध केल्यामुळे नातेवाइकांसमोरच पत्नीला अमानुष मारहाण !


बहराईच :
नवरा बायको यांच्यामधील भांडण मिटवण्यासाठी चालू असलेल्या चर्चेमध्येच कोतवाली क्षेत्रातील बंजारी मोड येथे रहाणारे साहिबे आलम आणि त्याच्या नातेवाइकांनी आलम याची पत्नी शीबा हिला लाथा-बुक्क्यांनी मारून तिची मरणासन्न अवस्था केली. एवढेच नाही, तर याला विरोध करणार्‍या शीबा यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. शीबा हिची स्थिती नाजूक असून तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आलम आणि शीबा यांचे ६ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पोलिसांनी पती आणि सासरे यांच्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे.

१. शीबा यांचे वडील अब्दुल वहीद यांनी दिलेल्या माहितीनुसार साहिबे आलम शीबाच्या कुटुंबियांकडे ५० सहस्त्र रुपये आणि दुचाकी गाडी यांची मागणी करत होता.

२. वहीद यांनी आरोप केला की, आलमचे अन्य एका युवतीबरोबर अनैतिक संबंध होते. यामुळेच तिचा छळ केला जात होता.

३. भांडण मिटवण्यासाठी शहरातील नाजिरपुरा मोहल्ल्यात सर्व नातेवाईक जमा झाले होते. या वेळी साहिबे आलम याने तीन वेळा तलाक म्हणत शीबाला तलाक दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *