Menu Close

कोंढवा (जिल्हा पुणे) येथील मदरशातील उस्तादाने मुलावर केले लैंगिक अत्याचार

हिंदूंचे आश्रम आणि संत यांच्या विरोधात नाहक कंठशोष करणार्‍या दूरचित्रवाहिन्या मदरशांमधून केल्या जाणार्‍या या अपप्रकारच्या विरोधात मूग गिळून गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

rape

पुणे : येथील कोंढवा भागातील एका मदरशातील उस्तादाने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी उस्ताद हफिज इसरार आणि मदरशाचे संचालक मुफ्ती शाहिद, मौलाना तौसिफ आणि मालक मुफ्ती शाकिर यांच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी सांगितले की, मूळचा खेड (जिल्हा पुणे) येथील रहिवासी असलेला हा पीडित मुलगा त्या मदरशामध्ये १० वीमध्ये शिकत होता. एप्रिल मासात उस्तादाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि ही गोष्ट कोणाला सांगू नये; म्हणून या उस्तादाने मुलाला कुराणाची शपथ घ्यायला लावली होती. त्या मुलाने हा प्रकार संचालकांसह मालकाला सांगूनही त्यांनी कारवाई केली नाही. १० वीचा निकाल लागल्यानंतर तो घरी गेला, तेव्हा त्याने वडिलांना उपरोक्त माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *