Menu Close

बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा – हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा !

नाशिक – येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट जिहाद’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून दिला आहे.

सदर कंपनीत ७ आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये ७ सापडले, तर अन्य शहरात किती असतील ?  हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट षड्यंत्र’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील व्यापक तपास होण्याची आवश्यकता आहे. ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. 

श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत जर ‘कॉर्पोरेट’च्या नावाखाली हिंदू महिलांची अब्रू लुटली जात असेल, तर हिंदू समाज शांत बसणार नाही. जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती समस्त हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

याविषयी देशभरात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने सादर करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे जयपूरमध्ये मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या नावे प्रशासनाला निवेदन

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

जयपूर (राजस्थान) – बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये हिंदु महिला कर्मचार्‍यांना लक्ष्य करणारी मानसिकता आणि संघटित ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने जयपूर प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री भजन लाल शर्मा अन् राष्ट्रीय महिला आयोग यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये समोर आलेल्या हृदयद्रावक घटनांचा हवाला देत समितीने म्हटले की, कॉर्पोरेट जगतात हिंदु महिलांचे शोषण करणे, त्यांना बळजोरीने नमाजपठण करण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडणे, हा एका मोठ्या ‘धार्मिक आतंकवादा’चा भाग आहे, जो आता सहन केला जाणार नाही.

समितीने जयपूरचे जिल्हाधिकारी संदेश नायक यांच्या माध्यमातून मागणी केली की, जयपूर आणि संपूर्ण राजस्थानमध्ये कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्येही अशा प्रकारच्या घटनांची त्वरित चौकशी करण्यात यावी. तसेच सरकारने आस्थापनांमध्ये ‘धार्मिक भेदभाव विरोधी परीक्षण चालू करावे आणि महिलांच्या साहाय्यासाठी विशेष हेल्पलाईन सिद्ध करावी’, जेणेकरून पीडित महिला कोणत्याही भीतीविना तक्रार नोंदवू शकतील. ‘कॉर्पोरेट’च्या नावाखाली हिंदु महिलांचे शोषण आणि धर्मांतराचा खेळ आता थांबला पाहिजे, अशा कडक शब्दांत समितीने चेतावणी दिली.

याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, समितीच्या शुभ्रा भार्गव; भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीनारायण शर्मा; हिंदु जागरण मंचचे प्रांत सदस्य अधिवक्ता राजकुमार, जिल्हा विधी प्रमुख डॅनी मिश्रा, महिला सहसंयोजिका अधिवक्ता अनुपमा चतुर्वेदी; ‘श्रुति-स्मृति अनुसंधान फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सिद्धार्थ उपाध्याय; ‘सेंटर फॉर सनातन रिसर्च’चे प्रदेश सरचिटणीस श्री. प्रकाश शर्मा; सनातन संस्थेच्या आशा राठी, ऋचा पंवार आदी उपस्थित होते.


 

वाराणसी

या वेळी ‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा, व्यापारी मंडळाचे महासचिव श्री. कविंद्र जयस्वाल, ‘चौरसिया व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. सुनील चौरसिया, ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे निमंत्रक अधिवक्ता अरुण कुमार मौर्य, तसेच या समितीचे सदस्य अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अवनीश राय, श्री. सुनील गुप्ता आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केशरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांना निवेदन देतांना राष्ट्र-धर्मप्रेमी

रांची

उपविभागीय अधिकारी कुमार रजत यांना निवेदन देतांना राष्ट्र आणि धर्म प्रेमी

कोल्हापूर

शाहूवाडी

तहसीलदार सीमा सोनवणे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हातकणंगले

हातकणंगले येथे तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

शिरोळ

शिरोळ पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर उपस्थित राष्ट्रप्रेमी

इचलकरंजी

इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयात अवल कारकून बेंजामिन मेस्त्री यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

बेंगळुरू: ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात फ्रीडम पार्क येथे आंदोलन

१९ एप्रिल रोजी बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती (HJS) तसेच विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी कर्नाटकभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक शोषणाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

सोलापूर

हिंदू जनजागृती समिती (HJS) ने सोलापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर केले. या निवेदनात बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कथित ‘लव्ह जिहाद’, धार्मिक आतंकाच्या रणनीती आणि धर्मांतरणाच्या जाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या कारवायांच्या मागे असलेल्या देशव्यापी साखळीचा पर्दाफाश करण्याचीही मागणी करण्यात आली.

या प्रसंगी सौ. राजश्री देशमुख, कु. भुवनेश्वरी पाटील, श्री यश मुगड्याल, रोहन गायकवाड, स्वप्निल सांगा, प्रेम बडीवाले, दिनेश जामदार, विनोद रसाल, संदीप ढगे आदी उपस्थित होते.

नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्त किरीथीका सी.एम. यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या महिला !

नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्यासह निफाड, येवला, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. यात अनेक ठिकाणी समितीच्या रणरागिणी या महिला शाखेतील युवती व महिलांची सहभाग लक्षणीय होता.

हिंजवडी (पुणे) येथे हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलन

नाशिक येथील बहुराष्ट्रीय प्रतिष्ठानांमध्ये हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकणे, नमाज पठण करण्यास तसेच गोमांस सेवन करण्यास भाग पाडणे अशा घटना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यामागील विषारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी यांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या घटनांमागे कार्यरत असलेल्या ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतरणाच्या रॅकेट’ची सखोल चौकशी करून त्यामागील देशव्यापी साखळी उघड करावी, या मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘हिंजवडी फेज १’ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

विमाननगर (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठांचे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

नाशिक येथे झालेल्या ‘कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’च्या विरोधात येथील विमाननगर येथे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले. २० एप्रिल या दिवशी झालेल्या या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ‘पुणे बार असोसिएशन’चे सदस्य अधिवक्ता राहुल कदम, प्रखर हिंदुत्वनिष्ठ सुशांत गाडे, श्री. दिलीप देवकर, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे आंदोलन होतांना पाहून परिसरातील ‘परवीन फ्लीटस’ आस्थापनातील काही कर्मचारी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात उपस्थित युवक-युवती यांनी जोरदार घोषणा देत ‘कॉर्पोरेट जिहाद’चा निषेध केला.

आंदोलनातील धर्मप्रेमींनी हातात धरलेले फलक

निफाड

येवला

पिंपलळव बसवंत

Latest News