
अकोला (महाराष्ट्र) – आगामी रमझानच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारी गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक आणि गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समिती, अकोलाच्या वतीने उपजिल्हाधिकारी (महसूल) यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांनी प्रशासनाला कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
उपजिल्हाधिकार्यांकडून सकारात्मक नोंद !
समितीच्या शिष्टमंडळाने अकोल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) निखिल खेमनर यांची भेट घेतली. त्यांनी निवेदन स्वीकारून विषयाचे गांभीर्य जाणून घेतले. या वेळी उपजिल्हाधिकारी म्हणाले की, प्राप्त निवेदन शासनाकडे पाठवण्याची योग्य ती व्यवस्था तातडीने केली जाईल.

निवेदन देतांना अकोला जिल्ह्यातील वाढत्या गोवंश तस्करीवर चिंता व्यक्त करण्यात आली. जानेवारी २०२६ मध्ये चिखल परिसरात कत्तलीसाठी गोवंशियांची निर्दयीपणे वाहतूक करणार्या ५६ बैलांची सुटका पोलिसांनी थरारक पाठलाग करून केली होती. यात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला.
कायदा असूनही कत्तली होणे हा हिंदूंचा अपमान ! – उदय महा, संयोजक, हिंदू राष्ट्र समन्वय समिती
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही रमझानमध्ये होणार्या अवैध कत्तली रोखण्यात याव्यात. गुढीपाडव्याच्या तोंडावर अशा घटना घडणे म्हणजे हिंदूंचा अपमान आहे. प्रशासनाने या प्रतिबंधक कायद्याची राज्यात कठोर कार्यवाही कार्यवाही करावी.
अन्य मागण्या !
१. महामार्गावर २४ घंटे विशेष नाकाबंदी करण्यात यावी.
२. तात्पुरत्या आणि बेकायदेशीर पशूवधगृहांवर बंदी घालावी.
३. संशयास्पद वाहनांची पडताळणी करण्यासाठी विशेष पोलीस पथके नेमावीत.
उपस्थित मान्यवर
अधिवक्त्या लता देशपांडे, सर्वश्री अमोल पसारी (अग्रवाल), योगेश अग्रवाल, उदय महा, गिरीश कुलकर्णी, अजय खोत, अमोल वानखडे, राजू क्षीरसागर, तेजस अग्रवाल, बंटी गुप्ता आणि पांडे यांच्यासह अनेक गोरक्षक निवेदन देतांना उपस्थित होते. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे.







