Menu Close

धनबाद (झारखंड) येथे ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’ येथील कर्मचार्‍यांसाठी ‘तणावमुक्ती’ विषयावरील व्याख्यान

तणावमुक्तीसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांची आवश्यकता ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

धनबाद येथे ‘बी.सी.सी.एल्.’च्या कार्यशाळेला संबोधित करतांना श्री. शंभू गवारे

धनबाद (झारखंड) – कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याविषयी ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’च्या (‘बी.सी.सी.एल्.’च्या) कर्मचार्‍यांसाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

या वेळी श्री. गवारे यांनी तणाव आणि तणावाची कारणे विषद करून ‘तणावमुक्तीसाठी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक प्रयत्नांची आवश्यकता आहे’, असे उपस्थितांना सांगितले. या कार्यशाळेत आस्थापनातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी ‘आम्ही असा विषय प्रथमच ऐकत आहोत. याचा आम्हाला केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, तर आमच्या वैयक्तिक जीवनातही लाभ होईल’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.

Latest News