हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश !

पुणे – येथील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदा वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी प्रशासनाला मागे घ्यावी लागल्याने या कार्यक्रमाला विजयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुरातत्व विभागाने फुले वाड्यातील पारंपरिक वटपूजनावर बंदी घालणारा आदेश काढला होता. या निर्णयाविरुद्ध हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी, स्थानिक महिला आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे पुरातत्व विभागाने बंदी उठवली. वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्थानिक महिलांनी फुले वाड्यात येऊन वटपौर्णिमेची पूजा केली. यामध्ये भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या महिला, सकल हिंदु समाज आणि स्थानिक नगरसेविका यांनी सहभाग घेतला. ‘हा धार्मिक स्वातंत्र्याचा विजय आहे’, अशी सर्वांची भावना आहे. ‘सकल हिंदु समाज’ आणि ‘महात्मा फुले वाडा परिसर भगिनी मंडळा’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
Vat Purnima was celebrated with devotion & enthusiasm near Mahatma Phule Wada, Pune!
🙏 Congratulations to all Hindu organizations & women who stood united to uphold this sacred tradition!@HinduJagrutiOrg @Medha_kulkarni @AdhivaktaSamiti @SanatanPrabhat @SG_HJS @SachdevaAmita pic.twitter.com/5i8Qdqv4MW
— Parag Gokhale (@Parag_hjs) June 29, 2026
हिंदूंचे सण म्हणजे निसर्ग संवर्धनाचा संदेश ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
वटपौर्णिमा सारखे भारतीय संस्कृतीतील सण मानवाला निसर्गाशी जोडणारे..🚩
वटपौर्णिमेचा हा पवित्र सण आपल्याला निसर्गाचे महत्त्व आणि वृक्ष संवर्धनाचा बहुमूल्य संदेश देतो. या निमित्ताने पुणे येथील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ परिसरात आयोजित भव्य वटपूजन कार्यक्रमात सहभागी झाले.
आपली… pic.twitter.com/cXiYxpe9nn
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) June 30, 2026
वटपौर्णिमा हा केवळ सण नसून ती निसर्गाची आराधना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. वडाच्या पारंब्यांचे पुनरुज्जीवन आणि त्याचे दीर्घायुष्य हे कौटुंबिक वंशाच्या अखंडतेचे प्रतीक मानले जाते. नागपंचमी, बैलपोळा यांसारखे सणही निसर्गसेवेचाच संदेश देतात.
सनातन धर्मात वटवृक्षाला विष्णूचे रूप मानले जाते ! – सौ. उज्ज्वला गौड, पुणे शहर सरचिटणीस (महामंत्री), भारतीय महिला मोर्चा
सनातन धर्मात वटवृक्ष हे श्रीविष्णूचे रूप मानले जाते. या श्रद्धेपोटी सर्व महिलांनी एकत्र येऊन आनंदाने ही पूजा केली.
वडपूजनानंतर उपस्थित नगरसेवकांनी खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचा सत्कार केला. यानंतर सौ. मेधा कुलकर्णी यांनी दुर्गा वाहिनीच्या सौ. कार्तिकी परदेशी आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर, तसेच अन्य सदस्य यांचा सत्कार केला. सनातनच्या साधिकांनी सौ. मेधा कुलकर्णी यांची ओटी भरली.
हा संघटित प्रयत्नांचा परिणाम ! – कु. क्रांती पेटकर, रणरगिणी शाखा
पुरातत्व विभागाच्या आदेशानंतर स्थानिक महिला, हिंदुत्वनिष्ठ संघटना, खासदार सौ. मेधा कुलकर्णी यांच्या संघटित प्रयत्नांमुळे यंदा पुन्हा एकदा येथे वटपौर्णिमेची पूजा अतिशय उत्साहामध्ये साजरी झालेली आहे.
उपस्थित मान्यवर
भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, भारतीय महिला मोर्चाच्या पुणे शहर सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, नगरसेविका मृणाल कांबळे, ऐश्वर्या थोरात, स्नेहा माळवदे, विश्व हिंदू परिषदेचे पुणेचे पूर्व विभाग सहमंत्री श्री. विजय कांबळे, कसबा जिल्हा मंत्री श्री. शैलेंद्र जाधव, पुणे (पूर्व) विभाग दुर्गावाहिनीच्या संयोजिका सौ. कार्तिकीताई परदेशी आणि कार्यालय प्रमुख कसबा जिल्हा येथील गोपाल शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे

विशेष
पुणे पूर्व विभाग दुर्गावाहिनीच्या संयोजिका सौ. कार्तिकीताई परदेशी यांचा या संपूर्ण लढ्यात सक्रीय सहभाग होता.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या प्रकरणात ‘तुघलकी’आदेश काढणार्या आणि हिंदूंना विनाकारण त्रास देणार्या पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!
बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? – रमेश शिंदे

पुण्यातील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी अखेर शासनाने मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात निवेदने देऊन ही संभाव्य बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली होती. याला संघटित प्रयत्नांमुळे मोठे यश आले असून प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.
🚩 Ban on Vat Pujan at Mahatma Phule Wada Revoked!
A major victory for Hindu Janajagruti Samiti and other pro-Hindutva organizations! ✨📜 The Maharashtra Government has revoked the ban on the traditional Vat Pujan at Pune’s historic Mahatma Phule Wada after strong public… pic.twitter.com/tjift8F8Md
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 26, 2026
हा हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरील आघात असल्याचे निवेदनात म्हटले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या या तीव्र आंदोलनाची आणि मागण्यांची नोंद घेत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, ‘महात्मा फुले वाडा हे स्मारक राज्य संरक्षित घोषित होण्यागोदरच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा व चालीरीती यांची सद्यःस्थिती कायम ठेवावी. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी.’
बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? – श्री रमेश शिंदे
या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले की, फुले वाड्यासमोरील वटवृक्षाच्या येथे वटसावित्री व्रताचे चालू असलेले पारंपारिक पूजन बंद करण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व खात्याने काढला होता. त्याला हिंदु जनजागृती समितीकडून विरोध केल्याने आणि अधिवक्त्यांनी कायदेशीर नोटीस दिल्याने त्यांना लोकशाहीची जाणीव झाली आणि भारतात धर्मस्वातंत्र्य आहे, हे मान्य करून त्यांनी तो तुघलकी आदेश मागे घेतला आहे. फडणवीस सरकारचे याबद्दल अभिनंदन; मात्र या प्रकरणात सरकारने हिंदूंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या, तसेच झारीतील शुक्राचार्य बनलेल्या पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सध्या महाराष्ट्रात असा तुघलकी कारभार चालणार नसल्याचे लक्षात आणून द्यावे, ही सरकारकडे मागणी आहे.
या यशानंतर समितीच्या वतीने समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी आवाहन केले आहे की, “जास्तीत जास्त हिंदू महिलांनी महात्मा फुले वाडा येथे जमून उत्साहात वटवृक्षाचे पूजन करावे आणि आपली धार्मिक परंपरा जपून या विजयाचा आनंद साजरा करावा”.
महात्मा फुले वाड्यापुढील वटवृक्ष पूजनावर बंदी घालणारा पुरातत्व विभागाचा ‘तुघलकी’ निर्णय त्वरित रहित करा – हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी !

पुणे – गंज पेठेतील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ स्मारकासमोरील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी हा हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील थेट आघात आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ आणि २६ अन्वये मिळालेल्या धार्मिक आचरणाच्या मूलभूत अधिकारांचे हे उघड उल्लंघन आहे. त्यामुळे ही बंदी कोणत्याही अटीविना त्वरित मागे घ्यावी, तसेच २९ जून या दिवशी महिलांना वटवृक्ष पूजनासाठी रितसर अनुमती देऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्व विभाग अन् महापालिका आयुक्त कार्यालय येथे दिले.

या वेळी शिष्टमंडळात हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, सुराज्य अभियानाचे सुरेंद्र महाजन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, तसेच अन्य संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरातत्व विभागाचे हेमंत गोसावी यांनी सांगितले की, या विषयाच्या संदर्भात दोन्ही विचारांच्या संघटनांची निवेदने आलेली आहेत. त्यातील सूत्रे आम्ही वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत पोचवतो. या संदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही बाजूंचा सविस्तर विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
प्रशासनाचा हिंदुद्वेषी दुजाभाव !
राज्यातील गड-दुर्गांवरील अनधिकृत मजार आणि बांधकामे हटवण्याविषयी पुरातत्व विभाग पूर्णतः निष्क्रीय आहे; मात्र हिंदूंच्या शेकडो वर्षांच्या शांततापूर्ण परंपरेला विरोध करण्यासाठी कमालीची तत्परता दाखवली जात आहे.
प्रशासनाने वटपूजनाची परंपरा रोखून हिंदूंच्या भावना दुखावल्यास, समस्त भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना समवेत घेऊन राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.







