Menu Close

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी २ सहस्र वारकरी आणि भाविक यांची उपस्थिती !

देव, देश आणि धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र रचणार्‍यांवर कारवाई करा ! – महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

पंढरपूर वारकरी महाअधिवेशनात दीपप्रज्वलन करतांना महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज (मध्यभागी), तसेच मान्यवर !

पंढरपूर – आषाढी वारी चालू असतांना वारीत पुणे येथे वारकर्‍यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटनांकडून घुसखोरी चालू आहे. एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या, आमचे पुतळे जाळण्यात आले. कुणी तरी सतत देव, देश आणि धर्म यांच्यावर आघात करत आहे. याच्या मागे कोण आहे ?, हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या डोळ्यांसमोर अन्याय आणि अत्याचार होत असतांना आपण शांत बसणे योग्य नाही. ‘एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा’, असे धोरण आपल्या संस्कृतीत कधीच नव्हते. ते आपल्यावर लादण्यात आले. सत्य, धर्म आणि न्याय यांसाठी प्राण गेला तरी चालेल; मात्र आपण नेहमी धर्माच्याच बाजूने राहिले पाहिजे, असे आवाहन महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी केले.

उपस्थितांना संबोधित करतांना महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज समवेत अन्य संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठाने ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. त्याच्या अध्यक्षस्थानावरून महाराज बोलत होते.

पंढरपूर वारकरी महाअधिवेशनासाठी उपस्थित असणारे भाविक, वारकरी !

Latest News