Menu Close

मुझफ्फरपूर (बिहार) येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

१० वर्षांपूर्वी केला होता इस्लामचा स्वीकार !

इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. या सर्वांनी मौलवी आणि मुसलमान नेते यांच्या सांगण्यावरून इस्लाम स्वीकारला होता. आता येथील शरवीर आश्रमामध्ये त्यांचे शुद्धीकरण करून हिंदु धर्मात परत घेण्यात आले.

आश्रमाचे स्वामी मृगेंद्र सिंह यांनी सांगितले की, येथील जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. आता त्यांना पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा झाल्यावर ते येथे आले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *