Menu Close

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

‘ऑनलाईन’ खेळांद्वारे अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर केल्‍याचे प्रकरण

मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान (डावीकडे)

ठाणे – भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून अटक केली आहे. तो रहात असलेल्‍या मुंब्रा भागातील देवरीपाडा येथील शाजिया इमारतीमधील घरावर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. त्‍याच्‍या आईलाही चौकशीसाठी बोलावण्‍यात आले होते. पोलिसांनी शहानवाजचे अधिकोषाचे (बँकचे) खाते गोठवले होते. ठाणे पोलिसांना मिळालेल्‍या माहितीनुसार अलीबाग येथील एका हॉटेलमध्‍ये धाड टाकून शहानवाज खान याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘त्‍याने मुलांचे धर्मांतर केले आहे का ?’, याची चौकशी करण्‍यासाठी त्‍याला गाझियाबाद पोलिसांच्‍या कह्यात देण्‍यात येणार असल्‍याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *