Menu Close

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

कोल्हापूर – घटस्थापनेला हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ केला. कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमी यांनी २६ ठिकाणी प्रतिज्ञा घेतल्या. कोल्हापूर शहरासह शिरोली, भुयेवाडी, गडहिंग्लज, कबनूर-इचलकरंजी, वाठार यांसह विविध गावांमधील गणेशोत्सव मंडळांचा यात समावेश होता.

भुयेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रतिज्ञा घेतांना हिंदुत्वनिष्ठ
शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतांना हिंदुत्वनिष्ठ
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतांना महिला

सांगली – सांगली जिल्ह्यात २१ ठिकाणी अशा प्रतिज्ञा घेण्यात आल्या. यात सांगली शहर, विश्रामबाग, मिरज, ईश्वरपूर यांचा प्रामुख्याने समावेश होता.

विधाता गणेशोत्सव मंडळ (जिल्हा सांगली) येथे प्रतिज्ञा घेतांना मंडळांचे कार्यकर्ते

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *