Menu Close

बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’

सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे व्हिडिओ !

पाकिस्तान असो कि बांगलादेश, मुसलमानांना लहानपणापासूनच हिंदूद्वेष शिकवला जातो, हेच यातून पुन्हा सिद्ध होते ! याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी गांधींच्या तीन माकडांप्रमाणे वागतात ! -संपादक 

नवी देहली – सामाजिक माध्यमांतून बांगलादेशातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक लहान मुलगा म्हणत आहे , ‘मी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू सौम्य सरकार याच्याशी यासाठीच भेटू इच्छित नाही; कारण तो एक हिंदु आहे.’

‘वॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ या नावाच्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यातील हा मुलगा मदरशांत शिकणारा आहे. त्याला पत्रकाराकडून विचारण्यात आले, ‘तुला कोणत्या बांगलादेशी क्रिकेट खेळाडूला भेटावेसे वाटते ?’ त्यावर तो म्हणतो, ‘मुश्फिकुर, मुस्तफिजुर रहमान, तासकीन अहमद आणि सैरिफुल यांना भेटू इच्छितो.’ त्यावर त्याला सौम्य सरकारविषयी विचारण्यात आले असता त्याने वरील उत्तर दिले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *