Menu Close

भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी इस्लामी देशांकडून ‘पी.एफ्.आय.’ला अर्थपुरवठा !

  • भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे जिहादी मुसलमानांचे स्वप्न आहे, हे काही नवीन नाही. आता अनेक इस्लामी देश भारतातील जिहाद्यांना सशस्त्र कृत्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, तसेच पैसे देत आहेत. त्यामुळे हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी तात्काळ कृती करणे आवश्यक आहे !
  • विदेशातून अशा प्रकारचे पैसे जिहाद्यांसाठी येत आहेत, हे सुरक्षायंत्रणांच्या लक्षात कसे येत नाही ? कि त्या झोपलेल्या आहेत ?
  • केंद्र सरकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर कधी बंदी घालणार ? असा प्रश्‍न आता हिंदूंच्या समोर आहे ! -संपादक

पाटलीपुत्र (बिहार) – येथील फुलवारी शरीफमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३ कार्यकर्त्यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या साहित्यावरून वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उजेडात आले.  या तिघांच्या चौकशीतून आता नवी माहिती समोर आली आहे की, तुर्कीये देशासह अनेक इस्लामी देशांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला अर्थपुरवठा केला जात आहे.

१. अटक करण्यात आलेला आतंकवादी दानिश हा पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना  ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’शी संबंधित आहे. तो पाकमधील फैजान नावाच्या व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात होता.

२. पी.एफ्.आय. संघटनेत एका पुस्तकाचे वितरण करण्यात येत होते. यात भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याविषयीची योजना आहे. त्यानुसार हे कार्यकर्ते कार्य करत होते. ते पाटलीपुत्र येथे आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवत होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *