Menu Close

गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामाच्या मंदिरातील ३ मूर्तींची चोरी !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांची मंदिरे असुरक्षित असणेे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

गाजीपूर (उत्तरप्रदेश) – येथील सैदपूरच्या ‘वॉर्ड ६’मध्ये असलेल्या श्रीराम जानकी मंदिरातील देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरात श्रीकांत जयस्वाल यांचे कुटुंब सेवारत असते. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजताची आरती पूर्ण करून त्यांचा परिवार घरी गेला. सकाळी जेव्हा ते मंदिरात आले, तेव्हा देवतांच्या मूर्तींचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. तेव्हा अष्टधातूने बनलेल्या देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *