Menu Close

‘इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवेदकाकडून ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख !

अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी जाणीव करून दिल्यावर चूक स्वीकारली !

अभिनेते चिन्मय मांडलेकर

मुंबई – ‘इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला. त्या वेळी मांडलेकर यांनी निवेदकाला तात्काळ थांबवून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करण्यास नम्रतेने सांगितले.

या वेळी चिन्मय मांडलेकर म्हणाले, ‘‘मराठी असल्याने आम्ही नेहमी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करतो.’’ त्या वेळी वाहिनीचे निवेदक म्हणाले, ‘‘तुमचे बरोबर आहे; केवळ मराठीच नव्हे, तर सर्वांसाठीच ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत.’’

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *