Menu Close

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पहाता येण्यासाठी मध्यप्रदेशातील पोलीस कर्मचार्‍यांना रजा संमत करण्याचा आदेश !

मध्यप्रदेश सरकारकडूनही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त !

उजवीकडे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील पोलीस कर्मचार्‍यांना कुटुंबासह ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघता यावा, यासाठी त्यांना रजा संमत करण्यात यावी, असा आदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला. हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे, असेही मिश्रा यांनी सांगितले.  दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मध्यप्रदेशातील अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *