Menu Close

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात

आरोपी महंमद झैद

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे महंमद झैद याने मंदिराच्या पुजार्‍याच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी झैद याने या मुलीची छेड काढल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर झैद याला अटक करण्यात आली होती. या अटकेचा सूड उगवण्यासाठी त्याने या मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी झैद याला या प्रकरणात अटक केली आहे. ही मुलगी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघाली होती. त्या वेळी झैद याने तिला चाकूचा धाक दाखवून एका निवासी उपाहारगृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली, तसेच हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांना झैद याच्या भ्रमणभाषमध्ये अनेक मुलींचे क्रमांक आणि माहिती मिळाली, तसेच अश्‍लीच चित्रे सापडली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *