Menu Close

कोरगज्जा मंदिराची विटंबना करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला अटक

धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई

मंगळुरू (कर्नाटक) – येथील मार्णमिकट्टे भागातील कोरगज्जा मंदिरासमोर वापरलेले गर्भनिरोधक आणि येशूवरील लेख असलेली पत्रके ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकार्‍यांनी धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई याला अटक केली आहे. तो मूळचा हुब्बळ्ळीचा रहिवासी असून त्याने आणखी १७ धार्मिक स्थळांची विटंबना केल्याची स्वीकृती दिली आहे. देवदासचे वडील जॉन देसाय यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे.

१. देवदास म्हणाला की, मी अस्वच्छ देवस्थानांवर अस्वच्छ प्रसाद टाकायचो; कारण बायबल म्हणते ‘देवाने वाईट आत्म्यांना या जगातून बाहेर काढले आहे आणि जर मोक्ष मिळवायचा असेल, तर लोकांना येशूची पूजा करावी लागेल.’ मी केलेल्या कृत्याचा मला पश्‍चात्ताप होत नाही.

२. पोलीस आयुक्त एन्. शशी कुमार यांनी आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असण्याची शक्यता नाकारली आणि सांगितले की, आरोपीने केलेल्या गुन्ह्यांविषयीची आणि ठिकाणांविषयीची माहिती अगदी अचूक आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *