Menu Close

द्वारका बेटावरील २ द्वीपांवर मालकी सांगणारी सुन्नी वक्फ बोर्डाची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली !

  • जे सत्य नाही, इतिहासही तसा नाही, तरीही सुन्नी वक्फ बोर्ड अशा प्रकारचा दावा करत थेट न्यायालयात जाण्याचे धाडस करते, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? हिंदु कधी मक्केवर दावा करण्याचे धाडस स्वप्नात तरी करू धजावतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • न्यायालयाने अशी याचिका फेटाळण्यासह ती करणार्‍या वक्फ बोर्डावर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
द्वारका बेट

द्वारका (गुजरात) – हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्‍या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. द्वारका बेटावर एकूण ८ लहान द्वीप आहेत.

१. वक्फ बोर्डाने याचिकेत म्हटले होते, ‘द्वारका बेटांवरील २ द्वीपांची मालकी आमच्याकडे आहे.’ यावर न्यायालयाने म्हटले, ‘तुम्ही काय सांगत आहात, हे तुम्हाला तरी कळते का ? श्रीकृष्णाची नगरी असलेल्या भूमीवर  वक्फ बोर्ड मालकी हक्क कसा काय सांगू शकते ?’, असे विचारत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

२. द्वारका बेट हे पूर्वी भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान होते. या बेटावर पोचण्यासाठी ओखा येथून नौकेद्वारे जाण्यासाठी ३० मिनिटांचा कलावधी लागतो. या बेटावर ७ सहस्र कुटुंब रहातात. त्यांतील ६ सहस्र कुटुंबे हे मुसलमान आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *