Menu Close

उज्जैन येथे मोहरमच्या वेळी धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

४ जणांना अटक

अशा घोषणा देणार्‍यांना पाकमध्ये पाठवा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे मोहरमच्या वेळी धर्मांध युवकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला असून ४ आरोपींना अटक केली आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले असून काही धर्मांधांची चौकशी चालू आहे.

१९ ऑगस्टच्या रात्री येतील गीता वसाहतीमध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांपैकी जफर, अनीस, अजीज, अज्जू, शानू, अब्दुल, कालू आदींनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तथापि पोलीस घटनास्थळी पोचल्यावर पाकप्रेमी पसार झाले. या घटनेची ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. त्यामध्ये अनेक धर्मांध देशविरोधी घोषणा देत असल्याचे आढळून आले आहे. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले असून त्यांनी अशा देशद्रोह्यांना पाकिस्तानात निघून जाण्याचे आवाहन केले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *