Menu Close

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला हवी : डॉ. योगेश पाटील, योग वेदांत सेवा समिती

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

dhule_andolan
आंदोलनात सहभागी झालेले हिंदु

धुळे : गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, योग वेदांत सेवा समितीचे डॉक्टर योगेश पाटील, बांधकाम संघटनेचे श्री. मनोज सूर्यवंशी, श्री. रवींद्र वाघमारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल हे उपस्थित होते. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी घोषणाही दिल्या.

श्री. विलास राजपूत म्हणाले, गोमातेचे गोचर्म आणि अस्थी यांची विक्री करून त्यापासून उत्पन्न मिळवण्याची योजना रहित करावी, तसेच हिंदूंच्या पैशांतून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन बंद करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *