Menu Close

जर्मनीमध्ये तरुणाकडून चाकूद्वारे आक्रमण : काही जणांचा मृत्यू !

जर्मन पोलीस घटनास्थळी

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या वुर्जबर्ग शहरातील बार्बारोसा चौकात २६ जूनच्या सायंकाळी एका तरुणाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात काही जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी तरुणावर केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या आक्रमणात किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी पोलिसांनी दिलेली नसली, तरी ‘बिल्ड’ नावाच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण घायाळ झाले आहेत. या आक्रमणकर्त्या तरुणाची ओळख अजूनपर्यंत पूर्णपणे पटलेली नाही.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *