निवडणुकीच्या वेळी कोरोना कुठे जातो ? तो कुंभमेळ्यातच येतो का ? – श्री परमेश्‍वरदास महाराज, सिद्धपीठ शिव साई शनिधाम आश्रम, नोएडा

श्री परमेश्‍वरदास महाराज (उजवीकडे) यांना ‘कुंभमहिमा विशेषांक’ देतांना श्री. सुनील घनवट

हरिद्वार – कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली. अनेक अडचणींनंतर कुंभमेळा भरला; मात्र भक्तांना कुंभमेळ्यात येण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. निवडणुकीच्या वेळी कोरोना कुठे जातो ? तो (कोरोना) कुंभमेळ्यातच येतो का ? असा सडेतोड प्रश्‍न नोएडा येथील सिद्धपीठ शिव साई शनिधाम आश्रमाचे श्री परमेश्‍वरदास महाराज यांनी येथे उपस्थित केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री परमेश्‍वरदास महाराज यांची भेट घेतली असता ते बोलत होते. या वेळी महंत जगदीश्‍वरदास महाराज यांचीही भेट घेण्यात आली. श्री. सुनील घनवट यांनी श्री परमेश्‍वरदास महाराज आणि महंत जगदीश्‍वरदास महाराज यांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​