Menu Close

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष मार्गिका

कुंभमेळ्यातील पवित्र स्नान

हरिद्वार – कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी किंवा अन्य स्नानाच्या दिवशी डेहरादून ते हरिद्वार या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांसह भाविकांची गर्दी असते. हरिद्वार परिसरात काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास महामार्गावरून रुग्णवाहिकांसह अन्य आपत्कालीन वाहनांना ये-जा करण्यासाठी डेहरादून ते हरिद्वारपर्यंत विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडोर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळ्याचे पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी दिली.

गुंज्याल यांनी पुढे म्हटले की, डेहरादून ते हरिद्वारपर्यंतच्या ४ मार्गिकेच्या महामार्गावरील एका बाजूची मार्गिका पवित्र स्नानाच्या दिवशी पूर्णपणे मोकळी  ठेवण्यात येणार आहे. या वाहनांना ‘लाल कार्ड’ दिल्याने विनाअडथळा ती ये-जा करू शकणार आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *