Menu Close

‘आश्रम’ वेब सिरीजवरून अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना न्यायालयाची नोटीस

जोधपूर (राजस्थान) – ‘आश्रम’ या वेब सिरीजमधून संतांचा आणि हिंदु धर्माचा अवमान केल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवरून जोधपूर सत्र न्यायालयाने अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर येत्या ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी या वेब सिरीजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ‘या सिरीजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असा आरोप त्यांनी करत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *