Menu Close

पाकच्या सिंधमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांची जाळपोळ

पाकमध्ये प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होतात; मात्र त्याविषयी संपूर्ण जग निष्क्रीय असल्याचे लक्षात येते. यावरून हिंदूंंना कुणीच वाली नाही, हेच खरे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : सिंध प्रांतातील गोथ सोमर पाली या भागात दोस्त महंमद नावाचा धर्मांध आणि त्याचे गुंड साथीदार यांनी हिंदूंना घर सोडून निघून जाण्याची धमकी दिली.

त्यानंतर हिंदूंनी जाण्यास नकार दिल्यावर त्यांना मारहाण केली आणि त्यांची घरे जाळून टाकली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. या जाळपोळीची छायाचित्रेही प्रसारित करण्यात आली आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *