Menu Close

राममंदिराचे भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक : पाकमधील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

कराची (पाकिस्‍तान) – ‘जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रभु श्रीराम हे आमचे आदर्श आहेत. आम्‍ही सुरक्षित आहोत आणि आमच्‍या धर्मावरील विश्‍वासामुळे कुणाला कोणतीही समस्‍या उद़्‍भवू नये. प्रभु श्रीराम यांचे जीवन आम्‍हाला एकता आणि बंधुभाव यांची शिकवण देते. जय श्रीराम !’, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पाकिस्‍तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी राममंदिराच्‍या भूमीपूजनानंतर ट्‍वीट करून दिली. दानिश हे हिंदु असल्‍याने त्‍यांना पाकच्‍या क्रिकेट संघातील मुसलमान खेळाडूंकडून दुजाभाव देण्‍यात आला होता, असे यापूर्वी समोर आले होते.

दानिश यांच्‍या या प्रतिक्रियेनंतर सामाजिक माध्‍यमांतून भारतीय हिंदूंकडून त्‍यांच्‍या सुरक्षेची काळजी घेण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍यावर दानिश यांनी उत्तर देतांना ‘आम्‍ही सुरक्षित आहोत आणि आपल्‍या धार्मिक परंपराविषयी कोणताही त्रास नाही’, असे म्‍हटले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *