Menu Close

काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी पाककडून नव्या आतंकवादी संघटनेची स्थापना

एकीकडे भारत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पाक नवनवीन आतंकवादी संघटना स्थापन करून आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भारताने काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच सत्य पुन्हा लक्षात येते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानने ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या नावाने एका नव्या आतंकवादी संघटनेची स्थापना केली आहे. गेल्या काही आठवड्यांत काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांचे दायित्व द‘ रेसिस्टन्स फ्रंट’नेच घेतले होते. लष्कर-ए-तोयबाच्या ३ प्रमुख आतंकवाद्यांचे ‘द रेसिस्टन्स फ्रंट’वर नियंत्रण आहे. गेल्या वर्षी काश्मीरविषयीचे कलम ३७० रहित केल्यानंतर या संघटनेची स्थापना करण्यात आली. पाककडून ‘आतंकवाद हा काश्मीरचा अंतर्गत विषय आहे’, असे भासवण्याचा याद्वारे प्रयत्न आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *