Menu Close

मालेगाव येथे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसह जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

मालेगाव (जिल्हा नाशिक) : येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णावर योग्य उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ‘प्रत्येक रुग्णाला कोरोनाचा रुग्ण समजूनच उपचार करतात’, असा आक्षेप घेत मयताच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंंडर फेकण्यास आरंभ केला. जमावाकडून तोडफोड चालू झाल्याने कर्मचार्‍यांत घबराट पसरली.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *