Menu Close

चीनने परिणाम भोगायला सिद्ध रहावे ! – डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

वॉशिंग्टन (अमेरिका) : चीनच्या विरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच; परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही; मात्र त्याने आता परिणाम भोगायला सिद्ध रहावे, अशी थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ट्रम्प पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांची चीनने वारंवार फसवणूक केली आहे. चीनने कोरोनाविषयी चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. चीनच्या वुहान शहरातूनच याचा जगभरात प्रसार झाला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *