Menu Close

शिवसेनेच्या वतीने चेन्नई येथे रक्तदान शिबिर

चेन्नई : शिवसेनेच्या शिवालय ट्रस्टच्या वतीने चेन्नई येथील श्री विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवसैनिकांनी ‘लायन्स क्लब ब्लड बँक’च्या सहकार्याने हे शिबिर घेतले. या शिबिरामध्ये ४५ सदस्यांनी रक्तदान केले. ‘लायन्स क्लब ब्लड बँक’चे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांनी रक्तदान सेवेत सहकार्य केले. या वेळी शिवसेनेचे तमिळनाडू राज्याचे अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *