- काँग्रेस सत्तेत असलेल्या मध्यप्रदेशातील एका शाळेत घडलेला प्रकार !
- राष्ट्रप्रेमी रा.स्व. संघाला कलंकित करण्यासाठीचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटल्यास त्यात चूक ते काय ? अशा शाळांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यांमधील शाळांमध्ये कसा द्वेषयुक्त इतिहास शिकवला जातो, हेच यातून दिसून येते !
भोपाळ (मध्यप्रदेश) : गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबर या दिवशी जबलपूरच्या एका शाळेत मोहनदास गांधी यांच्या जीवनावर नाटिका सादर करण्यात आली. त्यामध्ये गांधी यांच्या वधाच्या प्रसंगात नथुराम गोडसे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात दाखवण्यात आले. या प्रकरणी संघाचे स्थानिक पदाधिकारी यतिंद्र उपाध्याय यांनी लॉर्डगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी संबंधित शाळेच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. उपाध्याय यांनी जबलपूरचे पोलीस अधीक्षक अमित सिंह यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ‘गांधी यांच्या वधामागे संघाचा हात होता’, अशी अप्रत्यक्ष शिकवण शाळेकडून विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचा आरोप केला. याचसमवेत त्यांनी या प्रकरणी मानहानीचा दावा प्रविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात