Menu Close

पाकमध्ये हिंदु शिक्षकावर कथित ईशनिंदा केल्याचा आरोप करत धर्मांधांकडून मंदिराची तोडफोड

‘काश्मीरमध्ये भारत सरकार नरसंहार करत आहे’, असा आरोप करणार्‍या पाकमध्येच हिंदूंवर कशी आक्रमणे होत आहेत, हेच दिसत आहे. याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारतातील पाकप्रेमी काहीच बोलत नाहीत !

घोटकी (पाकिस्तान) : पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे धर्मांधांनी स्थानिक शाळेच्या हिंदु शिक्षकावर ईशनिंदा केल्याचा खोटा आरोप करून शाळेची आणि येथील मंदिराची तोडफोड केली. एका विद्यार्थ्याने या शिक्षकावर हा आरोप केला होता. त्याची माहिती मिळाल्यावर धर्मांधांनी ही तोडफोड केली.

या वेळी पोलीस तेथे उपस्थित होते; मात्र त्यांनी मंदिराचे आणि शाळेचे रक्षण केले नाही. (भारतातील आणि पाकमधील पोलीस एकाच माळेचे मणी आहेत. दोघेही हिंदूंच्या रक्षणाच्या वेळी निष्क्रीयच रहातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *