Menu Close

नाशिकमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

निवेदन स्वीकारतांना अपर जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर (उजवीकडे)
निवेदन स्वीकारतांना नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे (डावीकडे)

नाशिक : ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अपर जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. अपर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, २९ शाळा, महाविद्यालये यांसह ४ पोलीस ठाण्यांतही निवेदन देण्यात आले.

निवेदन स्वीकारतांना श्री. मनोज पिंगळे (डावीकडून दुसरे) आणि आमदार श्री. सुधीर तांबे (डावीकडून तिसरे)

रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज पिंगळे यांना निवेदन दिल्यावर त्या वेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे आमदार श्री. सुधीर तांबे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. हस्तपत्रके आणि भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *