Menu Close

भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पाककडून भारताच्या उपउच्चायुक्तांना समन्स

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! गेली १५ वर्षे प्रतिदिन पाककडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे आणि यात अनेक भारतीय सैनिक हुतात्मा झाले, तर अनेक जण घायाळ झाले आहेत, तरीही पाक भारतावर आरोप करत आहे, यातून त्याची हुशारी लक्षात येते !

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल

इस्लामाबाद : भारताकडून २२ आणि २३ जुलै या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत पाकने भारताच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. या कथित शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे २ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू आणि ५ जण घायाळ झाल्याचा दावा पाकने केला आहे. (पाककडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या वेळी भारत पाकला असे समन्स का बजावत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दक्षिण आशिया आणि सार्क विभागाचे महासंचालक आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी भारताचे उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना समन्स बजावले. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *