Menu Close

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार !

पणजी : गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. खारेवाडो, मुरगाव येथील हिंदु स्मशानभूमीत डॉ. मिस्किता यांचा मुलगा आणि मुलगी यांनी त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला. त्याआधी चिखली येथील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. मिस्किता यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘‘डॉ. मिस्किता यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान कायमच स्मरणात राहील.’’

डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचे ८ जुलै या दिवशी मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *